दहावीच्या निकालाबाबत जो मेसेज फिरतोय तो चुकीचा आहे-सूत्र
No icon

दहावीच्या निकालाबाबत

दहावीच्या निकालाबाबत जो मेसेज फिरतोय तो चुकीचा आहे-सूत्र

मुंबई : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, आता दहावीच्या (SSC Result mahresult.nic.in) विद्यार्थ्यांना आपल्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावीचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आज दहावीचा निकाल जाहीर होणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावीच्या बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

“दहावीच्या निकालाबाबत जो मेसेज फिरतोय तो चुकीचा आहे, त्यावर विश्वास ठेवू नये. दहावीच्या निकालाची तारीख बोर्डाने अजून जाहीर केली नाही. निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल.”, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी दिली.

राहुल राहंगडाले
Comment As:

Comment (0)