दहावीत मुलींची सरशी, पण एकूण निकाल १२ टक्क्यांनी घटला : SSC Result 2019
No icon

SSC Result 2019

दहावीत मुलींची सरशी, पण एकूण निकाल १२ टक्क्यांनी घटला : SSC Result 2019

'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा'च्या वतीनं दहावीचा निकाल अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलाय. राज्यातील ७७ टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवलंय. तर नेहमीप्रमाणेच यंदाही विद्यार्थिनींनीच बाजी मारलीय. राज्यातील कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्याचं आकडेवारीत पाहायला मिळतंय. राज्यातल्या एकूण शाळांपैंकी १७३४ शाळांचा १०० टक्के निकाल लागलाय. तसंच या निकालात विद्यार्थिनींचा निकाल विद्यार्थ्यांपेक्षा १०.६४ टक्क्यांनी जास्त लागलाय. ८३.०५ टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश मिळवलंय.

निकालाची टक्केवारी घसरली

परंतु, यंदाच्या परीक्षेचा निकाल तब्बल १२ टक्क्यांनी घटलाय. नवीन अभ्यासक्रमानुसार ही पहिलीच परीक्षा होती त्यामुळे नवीन परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. यात तोंडी परीक्षेचा समावेश नव्हता, अशी काही कारणं हा कमी निकालाबद्दल सांगता येतील.  

२० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

विशेष म्हणजे, या निकालात एकूण १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केलेत. यामध्ये लातूरच्या १६, औरंगाबादच्या ३ तर अमरावतीच्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

 

दिनेशकुमार
Comment As:

Comment (0)